Saturday, August 8, 2009

कधी तरी वेड्या गत वागायला हवे .....




कधी तरी वेड्या गत वागायला हवे .....
कधी तरी वेड्या गत वागायला हवे !!

भांड्यावर भांडे कधी भिडायाला हवे ..... भांड्यावर भांडे कधी भिडायाला हवे .....
उगाचच सखिवर चिडायाला हवे .....
मुखातून तिच्यावर पाखडता आग ..... मुखातून तिच्यावर पाखडता आग
एकीकडे प्रेमगीत लिहायला हवे !!
कधी तरी वेड्या गत वागायला हवे !!

विळिपरी कधी एक चंद्रकोर घ्यावी ..... विळिपरी कधी एक चंद्रकोर घ्यावी .....
हिरविशी स्वप्ने धारे धारे ने चिरावी .....
कोर कोर चंद्र चंद्र हारता हारता ..... कोर कोर चंद्र चंद्र हारता हारता
मनातून पुर्णबिंब तगायाला हवे !!
कधी तरी वेड्या गत वागायला हवे !!

मनातल्या माकडाशी हात मिळवुन ..... मनातल्या माकडाशी हात मिळवुन .....
आचरावे कधीतरी विचारा वाचून .....
झाडापास झोपुनिया हाती येता फ़ळ ..... झाडापास झोपुनिया हाती येता फ़ळ
सहजपणाने तेहि फेकायाला हवे !!
कधी तरी वेड्या गत वागायला हवे !!

कधी राती लावुनिया नयनांचे दिवे ..... कधी राती लावुनिया नयनांचे दिवे .....
पुस्तकाला काहीतरी वाचायला द्यावे .....
शोधुनिया प्राणातले दुमडले पान ..... शोधुनिया प्राणातले दुमडले पान
मग ..... मग त्याने आपल्याला चाळायला हवे !!
कधी तरी वेड्या गत वागायला हवे !!

स्वतःला विकून ..... स्वतःला विकून काय घेशील विकत .....
खरी खरी सूखे राजा मिळति फुकट !!
हपापुन बाजारात मागशील किती ..... हपापुन बाजारात मागशील किती
स्वतः तसे नवे काही शोधायला हवे !!
कधी तरी वेड्या गत वागायला हवे !!

तेच तेच पाणी आणि तीच तीच हवा ..... तेच तेच पाणी आणि तीच तीच हवा .....
आणि तुला बदलही कशासाठी हवा ??
जुनेच अजुन आहे रियाजावाचुन ..... जुनेच अजुन आहे रियाजावाचुन
गिळलेले सारे आधी पचायला हवे !!
कधी तरी वेड्या गत वागायला हवे !!

नको बघू पाठीमागे .. येइल कळून ..... नको बघू पाठीमागे .. येइल कळून .....
कितीतरी करायचे गेले रे राहून !!
नको करू त्रागा ..... नको करू त्रागा असा उद्याच्या दारात
स्वतःला कधी माफ़ करायला हवे !!
कधी तरी वेड्या गत वागायला हवे !!

कधी तरी वेड्या गत वागायला हवे !!
कधी तरी वेड्या गत वागायला हवे !!
कधी तरी वेड्या गत वागायला हवे !!

0 ricochets: