मी तिला विचारलं, तिने लाजून होय म्हटलं
सोनेरी गिरक्या घेत मनात गाणं नाचत सुटलं !
काय म्हणालात ? यात विशेष काय घडलं ?
त्यालाच कळेल ज्याचं असं मन जडलं !
तुमचं लग्न ठरवून झालं ?
कोवळेपण हरपून झालं ?
देणार काय ?
घेणार काय ?
हुंडा किती ?
बिंडा किती ?
काड्या किती ?
साड्या किती ?
याचा मान,
त्याचं पान,
सगळा मामला रोख होता,
व्यवहार भलताच चोख होता !
तुम्हाला हे सांगून तरी कळणार कसं ?
असलं गाणं तुमच्या कड़े पळणार कसं ?
पण ते जाऊ द्या,
माझं गाणं गाऊ द्या !
मी तिला विचारलं, तिने लाजून होय म्हटलं
सोनेरी गिरक्या घेत मनात गाणं नाचत सुटलं !
Wishing everyone a *Very Happy Valentine's Day* !! :-)
[courtesy: A mail fwd, I am not @ all good at poetry :-)]
[courtesy: A mail fwd, I am not @ all good at poetry :-)]
0 ricochets:
Post a Comment